UPI पेमेंटवर आजपासून नवीन नियम लागू ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी UPI rules new

UPI पेमेंटवर आजपासून नवीन नियम लागू ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी UPI rules new

UPI rules new आज आपण पाहणार पेमेंट वर आजपासून नवीन नियम कोणते लागू झालेले आहेत याविषयी आपण माहिती घेणार आहोत या प्रकरणावर ग्राहकांवर काय परिणाम होईल आणि त्याच प्रमाणे कोणतेही नवीन नियम आहेत या सर्वांचे माहिती आपण घेणार आहोत

UPI rules new संपूर्ण माहिती

राज्यातील यूपीआय पेमेंट धारकांसाठी महत्वाची बातमी आहे तुम्हाला माहीत असेल की युपीआय पेमेंट वापरून आपण लवकरच लवकर व्यवहार करत असतो अगदी एक रुपयापासून ते लाखापर्यंत आपण व्यवहार करतो आणि काही मिनिटातच आपले व्यवहार होत असतात आता यूपीए धारकांसाठी महत्वाची बातमी आहे आजच्या डिजिटल युगामध्ये यूपीआय हे एक महत्त्वाचे संसाधन आहे याच्यामध्ये काही नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत याविषयी माहिती बघुयात.

संपूर्ण भारतात UPI व्यवहार आता अधिक जलद होणार आहेत. राष्ट्रीय पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने सोमवारी नवीन नियम लागू केले आहेत, ज्यामुळे पैसे पाठवणे, शिल्लक तपासणे आणि फेल व्यवहारांची परतफेड ही सर्व प्रक्रिया 10 ते 15 सेकंदांत पूर्ण होणार आहे. याआधी या प्रक्रियेसाठी 30 सेकंद लागत होते.

नेमकं काय बदललं?
पूर्वी UPI द्वारे पैसे पाठवताना किंवा मिळवताना 30 सेकंदांपर्यंत वाट पाहावी लागायची. आता ही वेळ फक्त 15 सेकंद झाली आहे. रिसिव्हरचं UPI अ‍ॅड्रेस पडताळताना लागणारी वेळही 15 वरून 10 सेकंदांवर आली आहे.
UPI व्यवहार फेल झाले, तरी त्याचा रिझल्ट आता 10 सेकंदांत कळणार आहे. याआधी 30 सेकंदांपर्यंत वेळ लागायचा. नेटवर्क प्रॉब्लेममुळे जर व्यवहार झाला नाही तर तो आपोआप फेल व्यवहार मानला जाईल. बँका आणि अ‍ॅप्सना आता व्यवहार सुरू केल्यापासून 45-60 सेकंदांमध्ये त्या व्यवहाराची स्थिती तपासता येईल. याआधी त्यासाठी 90 सेकंदांचा वेळ लागायचा.

शिल्लक तपासणीवर मर्यादा
आता UPI अ‍ॅप्समधून दिवसाला जास्तीत जास्त 50 वेळा शिल्लक तपासता येणार आहे. याआधी यावर कोणतीही मर्यादा नव्हती. ही मर्यादा लावण्यामागे सिस्टमवरचा लोड

कमी करण्याचा उद्देश आहे.
UPI व्यवहार करताना आता अ‍ॅपमध्ये नाव बदलता येणार नाही. म्हणजेच, अ‍ॅपमध्ये ज्या व्यक्तीला पैसे मिळणार आहेत, त्याचं खरं नावच दिसेल. NPCI च्या या नव्या नियमामुळे फसवणुकीला आळा बसेल आणि व्यवहार अधिक पारदर्शक होतील. हे सर्व नियम 30 जूनपर्यंत अंमलात आणावे लागणार आहेत.

UPI चा झपाट्याने वाढणारा वापर
मे 2025 मध्ये देशात तब्बल 1,868 कोटी UPI व्यवहार झाले, जे मागील वर्षीच्या तुलनेत 33% अधिक आहेत. त्यामुळे या बदलामुळे UPI वापर अधिक सोपा, जलद आणि सुरक्षित होणार आहे.

अशाप्रकारे आपण पहिले की यूपीआय पेमेंट चे नियम काय बदल आहे त्याची माहिती आपण बघितले आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Follow Us On

Swati Bankar

Swati Bankar

Swati Bankar is a professional writer with 8+ years of experience, specializing in Sarkari Yojana, scholarships, employee news, and government updates. Daily Latest Update, She simplifies complex policies to keep readers well-informed and empowered.

Leave a Comment