Lic New Jobs आज आपण पाहणार आहोत की एलआयसी मध्ये नोकरी निघालेले आहे पगार किती असणार आहे त्याचप्रमाणे अर्ज कसा करायचा ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायचा कागदपत्र काय लागतील वयाची अट काय असेल पात्रता काय असतील आणि त्याचप्रमाणे परीक्षा कशी होतील याविषयी आपण माहिती बघूया
Lic New Jobs संपूर्ण माहिती
राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी मोठे आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे तुम्ही जर नोकरीच्या शोधत असाल तर तुम्हाला एलआयसी मध्ये चांगले संधी आलेली आहे लाइफ इन्शुरन्स कंपनीमध्ये भारतातील सर्वात मोठी आणि विश्वासू कंपनी एलआयसी या ठिकाणी नोकरी मिळवण्याची संधी तुमच्यासाठी आलेली आहे तर यासाठी अर्ज कसा करायचा अर्ज शुल्क काय असेल परीक्षा कशा होतील या संपूर्ण विषयाची माहिती आपण सविस्तरपणे पाहूयात
भारतीय आयुर्विमा महामंडळात (LIC) नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी बातमी आहे. एलआयसीने सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (AAO) आणि सहाय्यक अभियंता (AE) या एकूण ८४१ पदांसाठी भरती प्रक्रिया २०२५ ची अधिसूचना जाहीर केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार एलआयसीच्या (LIC) अधिकृत वेबसाइट licindia.in वर जाऊन आज १६ ऑगस्टपासून अर्ज करू शकतात.
ही भरती मोहीम संस्थेतील ८४१ रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येत आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया १६ ऑगस्ट २०२५ रोजी सुरू झाली असून, ती ८ सप्टेंबर २०२५ पर्यंत चालणार आहे. या भरतीसंबंधी पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर महत्त्वाचे तपशील खालीलप्रमाणे आहेत.
सरकारी क्षेत्रात स्थिर करिअरच्या शोधात असलेल्या पदवीधर आणि अभियंत्यांसाठी ही एक मोठी संधी मानली जात आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी आणि शेवटच्या क्षणी होणारी धावपळ टाळण्यासाठी वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असा सल्ला दिला जात आहे. अधिक माहितीसाठी, उमेदवारांनी एलआयसी इंडियाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
पदांचा तपशील (Vacancy Details)
या भरती मोहिमेअंतर्गत एकूण ८४१ पदांवर नियुक्ती केली जाणार आहे, यामध्ये
सहाय्यक अभियंता (Assistant Engineers): ८१ पदे
सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (AAO – स्पेशलिस्ट): ४१० पदे
सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (AAO – जनरलिस्ट): ३५० पदे
पात्रता निकष आणि अर्ज शुल्क
पात्रता (Eligibility Criteria)
वरील नमूद केलेल्या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेची सविस्तर माहिती अधिकृत अधिसूचनेमध्ये काळजीपूर्वक वाचावी. प्रत्येक पदासाठी आवश्यक असलेली पात्रता वेगवेगळी असू शकते.
अर्ज शुल्क (Application Fee):
SC/ST/PwBD प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ८५ रु./- + व्यवहार शुल्क (Transaction Charges) + GST असेल.
इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ७०० रु./- + व्यवहार शुल्क (Transaction Charges) + GST असेल.
निवड प्रक्रिया (Selection Process)
सहाय्यक प्रशासकीय अधिकारी आणि सहाय्यक अभियंता पदांसाठी निवड प्रक्रिया मुख्यत्वे तीन टप्प्यांत पार पडेल.
पूर्व परीक्षा (Preliminary Exam): ही एक प्राथमिक चाळणी परीक्षा असेल.
मुख्य परीक्षा (Mains Exam): पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल.
मुलाखत (Interview): मुख्य परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांना मुलाखतीसाठी निवडले जाईल.
‘या’ गुणांच्या आधारे अंतिम यादी जाहीर होणार?
हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की पूर्व परीक्षेतील गुण अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत. केवळ मुख्य परीक्षा आणि मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारावर उमेदवारांची अंतिम निवड यादी तयार केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांची त्यानंतर पूर्व-भरती वैद्यकीय तपासणी केली जाईल.
अशाप्रकारे आपण बघितलं गेलंय समिती नोकरी केली आहे ती आपल्याला कशी मिळू शकते याविषयी माहिती बघितली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा.