Home Loan Scheme आज आपण पाहणार की घर खरेदी करणाऱ्यांसाठी धक्का देणारी बातमी समोर येत आहे नेमकी काय धक्का देणारी बातमी आहे जर तुम्ही घर घेण्याच्या विचारत असतात किंवा तुम्ही घर घेतले असतील तर तुमच्यासाठी नक्कीच एकदा देणारी बातमी आहे याविषयी आपणच सविस्तर माहिती बघूया
Home Loan Scheme संपूर्ण माहिती
राज्यातील घर घेणाऱ्यांसाठी एक मोठी धक्का देणारी बातमी समोर येत आहे जर म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातले एक मोठे स्वप्न असतात तुम्हाला माहिती घर घेण्यासाठी सर्वात मोठी अडचण म्हणजे आपल्याला पैशांची अडचण असते म्हणून आपण यासाठी कुठल्या ना कुठल्या बँकेतून लोन करत असतो त्यानंतर लोन हे आपल्याला आरबीआयच्या नियमानुसार भेटत असतं आपण लोन जे घेतो त्याच्यामध्ये रेपो रेट हा एक महत्त्वाचा घटक असतो कारण याच्यावरच आपल्या ईएमआय ची किंमत कमी किंवा जास्त होत असते आता एक धक्का देणारी बातमी आलेली आहे याविषयी माहिती बघूया
घराचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो ग्राहकांना देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) मोठा धक्का दिला आहे. एसबीआयने होम लोनवरील व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे घर खरेदी अधिक महाग होणार आहे.
आतापर्यंत एसबीआयचे होम लोन व्याजदर 7.50% ते 8.45% या दरम्यान होते. मात्र, आता बँकेने या दराचा वरचा टप्पा 25 बेसिस पॉईंटने वाढवून 8.70% केला आहे. म्हणजेच निचांकी मर्यादा तीच ठेवली असली तरी ग्राहकांना जास्तीत जास्त 8.70% पर्यंत व्याज द्यावे लागणार आहे. या निर्णयाचा थेट फटका कमी क्रेडिट स्कोर असलेल्या नव्या ग्राहकांना बसणार आहे.
जुलै महिन्यातही एसबीआयचा व्याजदर 7.50% ते 8.45% इतकाच होता. पण ऑगस्टपासून नव्या नियमांनुसार घर घेण्यासाठी कर्ज घेणाऱ्यांना 7.50% ते 8.70% इतके व्याज द्यावे लागेल.
सरकारी क्षेत्रातील युनियन बँक ऑफ इंडियानेही काही दिवसांपूर्वी व्याजदर वाढवून ते 7.35% ते 7.45% इतके केले होते.
खासगी क्षेत्रात आयसीआयसीआय बँक 8%, एचडीएफसी 7.90% आणि अॅक्सिस बँक 8.35% या किमान व्याजदरावर होम लोन देत आहेत. त्यामुळे स्पर्धात्मक बँकिंग बाजारात एसबीआयने व्याजदर वाढवल्यामुळे इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकाही याच पावलावर पाऊल ठेवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कपात करून लोकांना दिलासा देण्याचे प्रयत्न सुरू असतानाच एसबीआयचा हा निर्णय घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी धक्कादायक ठरत आहे. सध्या हे बदल केवळ नव्या ग्राहकांवर लागू होणार असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.
FAQs
प्रश्न 1: SBI ने व्याजदरात किती वाढ केली आहे?
उत्तर: SBI ने होम लोन व्याजदराच्या वरच्या बँडमध्ये 25 बेसिस पॉइंटची वाढ केली आहे.
प्रश्न 2: नवीन व्याजदर किती आहेत?
उत्तर: आता व्याजदर 7.50% ते 8.70% दरम्यान असतील.
प्रश्न 3: या बदलाचा परिणाम कोणावर होणार आहे?
उत्तर: हा बदल प्रामुख्याने नवीन होम लोन घेणाऱ्या ग्राहकांवर होईल.
अशाप्रकारे आपण बघितले घर घेणाऱ्यासाठी कोणते धक्का देणारी बातमी आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप नक्कीच जॉईन करा.