PM Vidya Lakshmi Yojana आज आपण पाहणार आहोत की विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे शिक्षणासाठी आता दहा लाख रुपये मिळणार आहेत यासाठी त्यांना अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल कागदपत्र कोणती करा लागतील आणि हे पैसे कोणत्या विद्यार्थ्यांना मिळतील आणि आपल्या खात्यात कशी मिळतील कोणती योजना आहे ज्यामुळे या शिक्षणाच्या योजनेचा त्यांना लाभ मिळेल याविषयी आपण माहिती बघूया
PM Vidya Lakshmi Yojana संपूर्ण माहिती
राज्यातील देशभरातील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे राज्य सरकार केंद्र सरकार नेहमीच विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वेगवेगळ्या शिष्यवृत्ती राबवत असतात त्याच्यामध्ये आता पीएम विद्यालक्षमी योजना या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तब्बल दहा लाख रुपये मिळतील त्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी खूप चांगला फायदा होईल आणि ते आपल्या शिक्षण पूर्ण करू शकतील आता हे दहा लाख रुपये आपल्याला कसे मिळतील यासाठी काय या कागदपत्र आवश्यक आहेत शिक्षणाच्या काय अटी आहेत बँकेत आपल्या कृषी जमा होतील ते सर्वांचा तपशील आपण बघणार आहोत
अनेक हुशार विद्यार्थ्यांना केवळ आर्थिक अडचणींमुळे आपलं शिक्षण सोडावं लागतं. अशा मुला-मुलींसाठी केंद्र सरकारने ‘पीएम विद्या लक्ष्मी योजना’ सुरू केली आहे. या योजनेमुळे गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना आता कोणत्याही गॅरेंटरशिवाय लाखो रुपयांचं शिक्षण कर्ज मिळू शकतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या कर्जातून तुम्ही भारतातच नाही, तर परदेशातही जाऊन अभ्यास करू शकता.
ही योजना खास करून अशा विद्यार्थ्यांसाठी आहे, ज्यांना चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे पण फी भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. या योजनेचा उद्देश हाच आहे की, कोणताही होतकरू विद्यार्थी पैशांअभावी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये.
‘पीएम विद्या लक्ष्मी’ योजनेचे प्रमुख फायदे:
गॅरेंटरची गरज नाही: या योजनेतून विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज घेण्यासाठी कोणत्याही गॅरेंटरची किंवा गॅरेंटरची गरज नाही.
व्याज अनुदान
ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 4.5 लाख रुपयांपर्यंत आहे, त्यांना कर्जाच्या पूर्ण व्याजावर 100% सबसिडी मिळते.
ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 4.5 लाख ते 8 लाख रुपयांपर्यंत आहे, त्यांना 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 3% व्याज अनुदान दिलं जातं.
बँकेसाठी कमी धोका: 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर सरकार 75% क्रेडिट गॅरंटी देते. यामुळे बँका विद्यार्थ्यांना कर्ज द्यायला जास्त तयार होतात कारण त्यांचा धोका कमी होतो.
या योजनेसाठी पात्रता आणि अटी
शैक्षणिक पात्रता:
तुमचा प्रवेश NIRF रँकिंग असलेल्या चांगल्या कॉलेजमध्ये झालेला असावा.
उत्पन्नाची मर्यादा: तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी असावं.
इतर अटी काय आहेत
तुम्ही आधीपासून कोणत्याही सरकारी शिष्यवृत्ती किंवा व्याज अनुदान योजनेचा लाभ घेत नसावा.
अभ्यासातून मध्येच बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना (शैक्षणिक किंवा शिस्तीच्या कारणांमुळे) या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
अर्ज कसा कराल आणि कोणती कागदपत्रे लागतील?
तुम्ही या योजनेसाठी pmvidyalaxmi.co.in या पोर्टलवर थेट अर्ज करू शकता. हे पोर्टल वापरण्यास अतिशय सोपे आणि पूर्णपणे डिजिटल आहे. या पोर्टलवर देशातील सर्व प्रमुख सरकारी आणि खासगी बँका जोडलेल्या आहेत.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे:
ओळखपत्र: आधार कार्ड / पॅन कार्ड
पत्त्याचा पुरावा: आधार कार्ड / वीज बिल
शैक्षणिक कागदपत्रे:
10 वी, 12 वी आणि पदवीचे गुणपत्रक, कॉलेजमधील प्रवेश पत्र.
उत्पन्नाचा दाखला: राज्य सरकारकडून दिलेला कौटुंबिक उत्पन्नाचा दाखला
अशाप्रकारे आपण बघितलं की राज्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिक्षणासाठी दहा लाख रुपये कोणत्या योजनेअंतर्गत मिळणारे त्याची माहिती बघितली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा .
शिक्षणासाठी पैसे
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पैसे 1000000
I am fill up the form so sarkari yojna
My 10 lakh rupees
Shikshanasathi form fill karaycha ahe
vidhyarthi shikshanas yojna
I am first year FY BA
माझी 10th झाली आहे मी अनाथ आहे माझ्या पुढच्या शिक्षणसाठी कृपया सरकारने मदत करावी अशी विनंती…
Diploma
Diploma in cwit
Hello sir
Mala la sr karja aahe sr pilizz pilizz pilizz pilizz pilizz pilizz pilizz pilizz 😔😔
10vi class english
10th class english